अवैध धंद्यांवर व दारूबंदी विरुद्ध केलेली धडक कार्यवाही.
प्रतिनिधी :अब्दुल कदीर बख्श ((हिंगणघाट )
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, हिंगणघाट यांच्या पथकाने दोन वेगवेगळे ठिकाणी केलेली कार्यवाही दि 24-10/24 रोजी पोलीस स्टेशन, गिरड हद्दीतील मौजा मंगरूळ येथे आरोपी क्र 1) सागर प्रभाकर कुबडे, रा मंगरूळ हा आरोपी क्र 2) यूवराज नटे, रा. बुट्टीबोरी व आरोपी क्र 3) रणवीर सिंग बावरी, रा हिंगणघाट यांच्या सांगणे वरून सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन त्या पैशाच्या मोबदल्या कागदावर सट्टा पट्टीचे आकडे लिहून स्वतःचे व मालकाचे फायदा करिता सट्टा पट्टीचा जुगार खेळ खेळत असताना रंगेहात मिळून आला, आरोपी च्या ताब्यातुन सट्टा पट्टी चे नगदी 6085/-रु व सट्टा पट्टी चे आकडे लिहून असलेले कागद मिडून आल्याने जागीच सविस्तर मोका जप्ती पंचनामा कारवाई करून पो स्टे परत येऊन आरोपीतांन विरुद्ध गुन्हा नोंद केला तसेच दि 26-10-2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाला मुखबीर कडुन खाञीशीर मिळालेल्या खबरे वरून आरोपी (1) चेतन वाटमोडे ,रा संत चोखोबा वॉर्ड, हिंगणघाट याचे सांगणे वरून आरोपी क्र (2) तेजस कांबळे, रा संत चोखोबा वॉर्ड, हिंगणघाट + 1, याने त्याच्या ताब्यातील बिना क्रमांकाची काड्या कलर ची Bajaj Pulsar 220 गावठी मोहा दारू ची वाहतूक करताना रंगेहात मिडून आला , त्याचा ताब्यातुन 1) बिना क्रमांकाची काड्या कलर ची Bajaj Pulsar 220 किंमत 95,000/- रु व 2) गावठी मोहा दारू कि 16,000/- असा जु कि 1,11,00/- रु चा माल मिडून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पो स्टे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला ......
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. रोशन पंडित सा . यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे पथकतील .पोलीस हवालदार नरेंद्र डहाके,अश्विन सुखदेवे ,पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांनी केली.